इको फ्रेंडली पद्धतीने बकरी ईद

0

उत्तर प्रदेश: मुस्लीम बांधवांसाठी आज मोठा दिवस आहे. आज देशभरात बकरी ईदचा जल्लोष आहे. बकर्‍याचा बळी देऊन हा सण साजरा केला जातो. मात्र प्राण्यांचा असा बळी देणं हा वादाचा मुद्दा झाला आहे. यंदा उत्तरप्रदेशात मात्र यावर एक इको फ्रेंडली पद्धतीने तोडगा काढण्यात आला आहे.

लखनऊमध्ये काही मुस्लीम बांधवांनी पारंपारिक पद्धतीने बकरी ईद साजरी करण्यापेक्षा बकरीच्या चेहर्‍याचा केक कापून प्रातिनिधिक स्वरूपात बकरी ईद साजरी केली आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्याच्या निधनानंतर सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अटल बिहारींच्या निधनानंतर आपला राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांनाही साधेपणाने यंदा ईद साजरी करण्याचं आवाहन केल्याचे शिया मौलवी सैफ अब्बास यांनी सांगितले आहे.