इच्छा असेल त्यातच करिअर करून यशस्वी व्हा: ना.पाटील

0

जळगाव । विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या शालेय साहित्यात तसेच परिस्थितीत मात करून यशस्वी होण्यासाठी अभ्यासात लक्ष घालुन आपले ध्येय गाठावे असे सांगुन आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेवुन जिवनात यशस्वी व्हा असा सल्ला विद्यार्थ्यांचा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. येथील कांताई सभागृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार बांधव, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गरजु पाल्यासाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम झाला.

आई बाबा,नंतर साईबाबा
कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आज गुरुपौर्णीमा आहे. यामुळे पहीले आईबाबा मग साईबाबा. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना त्रास देवू नका. आम्हाला लहानपणी शिकत असतांना फक्त चारच वह्या मिळत होत्या. या चार वह्यांमध्ये आम्ही शाळेचा वर्षभराचा अभ्यास करीत होतो असे सहकार राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले. आ. राजूमामा भोळे यांनी शिक्षण घेत असतांनाच भोवतालच्या निसर्गाचा निरीक्षणपूर्वक अभ्यास करुन दैनंदिन जीवनात पर्यावरण जागृतीत सातत्य ठेवून निसर्गरक्षणाचे कार्य विद्यार्थांनी हाती घ्यावे, असे प्रतिपापदन केले. यावेळी अधिक्षक कराळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

आमचीही होते पंचवार्षिक परिक्षा…!
‘गुरूजी म्हणजे आदर्श’ या आदर्श व्यक्तीच्या आमच्या वेळी पेहराव पांढरा शर्ट, धोतर व डोक्यावर टोपी घालुन गुरूजी गावात येत होते. गुरूजींचा हा विशीष्ट पेहरामुळे त्यांची ओळख निर्माण झाली होती. यामुळे गुरूजी गावात आले समजत होते. आता जिन्सची पॅण्ड गुरूजी घालतात यामुळे गावात कोण आले हे समज नाही. विद्यार्थ्यांना जशी दरवर्षी परिक्षा द्यावी लागते तशी आम्हालाही दर पाच वर्षांनी परिक्षा द्यावी लागते. या पाच वर्षाच्या परिक्षेत आम्ही नापास झाले तर पुन्हा 17 नंबरचा फार्म भरावा लागतो. पालकांचे हम दो हमारे दो प्रमाणे नियोजन असल्याने विद्यार्थ्यांनी वेळेवर सर्व सुविधा मिळत आहे. तसेच खेड्यागावातील विद्याथ्र्यांना शहरात शिक्षण घेण्यासाठी सरकारने मोफत बससेवा सुरू केली आहे. आताच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण खूपच चांगले आहे.

पुढील वर्षी टॅब द्या….
विद्यार्थी दहावी पास झाला की 12 हजाराचा मोबाईल, 12 वी पास झाला की दुचाकी अ‍ॅक्टीवा आता तर दुचाकीशिवाय विद्यार्थी महाविद्यालयात जात नाही. आमच्या वेळेस फक्त सायकल होती. तसेच पुढच्या वर्षी गुणवंत्त विद्याथ्र्यांना टॅब देण्याचे नियोजन करण्याच्या सुचनाही सहकार राज्यमंत्री पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना दिल्यात. आमदार सुरेश भोळे यांनी शिक्षणाबरोबरच प्रत्येक विद्याथ्र्यांने पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचा संदेश दिला. यावेळी पोलीस अधिक्षक दत्तात्रय केराळे, माजी शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड, प्रा. डॉ.सुनिल कोळी आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अय्याज मोहसिन यांनी तर आभार कार्याध्यक्ष भरत काळे यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर ना. गुलाबराव पाटील यांच्यासमवेत शिवसेना आमदार किशोर पाटील, आमदार राजूमामा भोळे, पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव अरोटे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, अध्यक्ष अ‍ॅड. राजेश झाल्टे, पराग कोचुरे , जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, कार्याध्यक्ष भरत काळे, राजेंद्र पाटील, अजय वाघ, सुनिल भोळे, संजय तांबे, इमरान शेख, दिलीप जैन उपस्थित होते. प्रेक्षागृहात शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार पाल्यांसह उपस्थित होते.