अॅरीझो । बलाढय इटलीच्या संघावर भारताच्या अंडर -17 फुटबॉल संघाने मैत्रीपूर्ण सामन्यात 2-0 असा विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथमच अशी कामगिरी केल्याने सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वर्ल्डकपची तयारी करण्यासाठी भारताचा अंडर-17 संघ सध्या युरोप दौ-यावर आहे.
इटलीच्या अंडर-17 संघाबरोबर मैत्रीपूर्ण लढतीचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात भारताकडून अभिजीत सरकारने 31 व्या आणि राहुल प्रवीणने 80 व्या मिनिटाला गोल केला. यावर्षी भारतामध्ये अंडर-17 फुटबॉलचा वर्ल्डकप होणार आहे. सामना सुरु झाल्यानंतर आठव्या आणि 13 व्या मिनिटाला भारताची गोल करण्याची संधी हुकली पण 31 व्या मिनिटाला अभिजीत सरकारने इटलीची बचावफळी भेदून सुंदर गोल केला आणि भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या कामगिरीबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी ट्विट करुन भारताच्या अंडर-17 संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.