इटालियन ओपनमध्ये मुगुरूझा विजयी, केर्बर पराभूत

0

रोम :स्पेनच्या गार्बेनी मुगुरूझाने इटालियन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. जर्मनीच्या टॉप सीडेड केर्बरचे आव्हान संपुष्टात आले तर स्लोव्हाकियाच्या सिबुलकोव्हाला दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. मुगुरूझाने लॅटव्हियाच्या जेलेना ओस्टापेंकोचा 2-6, 6-2, 6-1 असा पराभव करत एकेरीची तिसरी फेरी गाठली. अन्य एका सामन्यात रशियाच्या मॅकरोव्हाने स्लोव्हाकियाच्या चौथ्या मानांकित सिबुलकोव्हावर 1-6, 6-1, 6-3 अशी मात केली.

अमेरिकेच्या अनुभवी व्हिनस विलियम्सने युक्रेनच्या सुरेंकोचा 6-4, 6-3 असा फडशा पाडला. इस्टोनियाच्या कोंटावेटने जर्मनीच्या केर्बरचा पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. मुगुझा आणि जर्मनीची जॉर्जेस यांच्यात तिसऱ्याफेरीत गाठ पडेल. कोंटावेटचा तिसऱ्या फेरीतील सामना क्रोएशियाच्या बारोनी बरोबर होणार आहे. रशियाची शरापोव्हा हिला दुसऱया फेरीतील सामन्यात खेळताना दुखापत झाल्याने तिने स्पर्धेतून माघार घेतल्याने बारोनीला पुढील फेरीत चाल मिळाली, द्वितीय मानांकित प्लिसकोव्हाने अमेरिकेच्या डेव्हिसचा 6-1, 6-1, रूमानियाच्या सहाव्या मानांकित सिमोना हॅलेपने जर्मनीच्या सिगमंडचा 6-4, 6-4, फ्रान्सच्या कॉर्नेटने स्विटोलिनाचा 6-4, 7-6 (11-9), बर्टन्सने अमेरिकेच्या बेलिसचा 6-4, 6-0 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.