इतका कमजोर पंतप्रधान मी आजपर्यंत पाहिलेले नाही: प्रियांका गांधी

0

लखनौ: कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले. विद्यमान पंतप्रधानांपेक्षा कमजोर पंतप्रधान मी आजपर्यंत पाहिलेला नाही अशी टीका प्रियांका गांधींनी केली. राजकीय शक्ती मोठ मोठ्या प्रचारसभा घेण्याने नाही येत, सामान्य जनतेच्या समस्या समजून त्या सोडविल्या गेल्या पाहिजे, त्यातच राजकीय शक्ती आहे. मात्र आपले पंतप्रधान सामान्य जनतेच्या समस्या लक्षात घेत नाही, नुसती भाषणबाजी करत असतात अशी टीका प्रियांका गांधींनी केली. पंतप्रधान इतकी अहंकारी झाले आहेत, की तुमच्या समस्या ऐकून घेत नसून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न देखील करत नसल्याचे प्रियांका गांधींनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाभारतातील दुर्योधानासाठी केली होती. दुर्योधनाप्रमाणे मोदी अहंकारी असल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर भाजपकडून बरीच टीका झाली.