इतर खर्च बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सर्व मदत देऊ: मुख्यमंत्री

0

अकोला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी अकोला दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार शेतकऱ्यांना सर्व मदत देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ६ तारखेपर्यंत १०० टक्के पंचनामा करण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहे. कृषी विद्यापीठांना देखील पंचनाम्यासाठी यंत्रणा वापरण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. इतर खर्च बाजूला ठेवू पण शेतकऱ्यांना सर्व मदत देऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

ओल्या दुशाकाळातही कोरडा दुष्काळासारखी मदत दिली जाईल, जी काही मदत आवश्यक आहे ती सगळी मदत पुरविली जाईल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.

पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनाच मदत मिळेल असे नाही, सरसकट मदत दिली जाईल. पिक विमा भरला असेल आणि पावती नसेल तरी काळजी करण्याचे कारण नाही, शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे कमी झाले असेल तो पुरावा ग्राह्य धरले जाईल आणि मदत देण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी दिले.