इतर खेळांमध्येही हिरो घडत असतात – गौतम गंभीर

0

नवी दिल्ली : भारतामध्ये क्रिकेटला मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. क्रिकेट हा भारताचा प्रसिद्ध खेळ असल्याने क्रिकेटपटूंना प्रत्येक वेळी अधिक महत्व दिले जाते. पण हिरो फक्त क्रिकेटमध्येच नसतात, तर इतर खेळांमध्येही हिरो घडत असतात, असे मत क्रिकेटपटू गौतम गंभीर याने एका मुलाखतीतून व्यक्त केले आहे.

गंभीर म्हणाला की, क्रिकेट हा भारतातील सर्वात आवडता खेळ आहे. पण हिरो हे फक्त क्रिकेटमध्येच नसतात. विशेषतः आशियाई स्पर्धेमधील यशानंतर तरी इतर खेळांनाही आपण समान प्राधान्य द्यायला पाहिजे. त्यामुळे आता अन्य खेळांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे तो म्हणाला. क्रिकेटचे कौतुक आता पुरे झाले. आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या, असे परखड मतही भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.