नवापूर । ग्राहकांच्या गरजांची पुर्तता करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य असुन यासाठी ग्राहकांचे सहकार्य देखील आवश्यक असते, असे मत भरत गावीत यांनी व्यक्त केले. एकिकडे इतर पतसंस्था व बँका डबघाईला जात असतांना आपली पतपेढी प्रगती पथावर आहे. याचे श्रेय ग्राहकांना असुन त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे ते म्हणाले. शहरातील दादासाहेब माणिकराव गावीत नागरी पतसंस्थेच्या पंधराव्या वाषीॅक सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी लक्ष्मीमाता व स्व.हेमालताताई वळवी यांच्या प्रतिमेचे पूजन चेअरमन भरत गावित यांच्याहस्ते करण्यात आले.
परतफेड करणार्या सभासदांचा सत्कार
पुढे भरत गावित म्हणाले की, आर्थिक वसुली हा पतसंस्थेचा कणा असून वसुलीत ग्राहकांचे सहकार्य योग्य प्रमाणात मिळत आहे. कर्जदारांनी आपले कर्ज नियमित फेडले तर पतसंस्थेद्वारे जास्त ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देणे सुलभ ठरणार असून ग्राहकांनाही सोयीचे होणार आहे, असे ते म्हणाले. ‘विना सहकार नाही उध्दार’ या ब्रीद वाक्याप्रमाणे पतसंस्थेची प्रगती होत आहे. पतसंस्थेत आथिॅक वषॉत 46 लाखाच्या ठेवी आल्याने सहा कोटी 51 लाखाच्या ठेवी झाल्या आहेत. ग्राहकांच्या ठेवी अत्यंत सुरक्षीत असल्याचे अभिवचन देतांना पतसंस्थेच्या पारदर्शक व काटेकोर नियम पालनामुळे लेखा परीक्षणाचा सातत्याने मिळणारा ’अ’ दजॉ यंदाही कायम राहिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. विविध विषयांवर चर्चा करून सभासदांकडून विषय सुचीवरील विषयांना मंजुरी देण्यात आली. पतसंस्थेत नव्याने दाखल झालेल्या संचालक व कर्जाची सुयोग्य परतफेड करणार्या 77 सभासदांचा मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव
पतसंस्थेचा जन्म व वाढ कशी झाली व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रथम अध्यक्षा स्व.हेमलता वळवी यांनी लावलेले रोपटे आज मोठे होत आहे. ही पतसंस्थेची प्रगती असून तीच्या वाढीसाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. असे सांगत जुन्या आठवणींना भरत गावीत यांनी उजाळा दिला. प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रा.आय जी पठाण, विजय बागुल, पमा सैय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश देसले व जयवंत जाधव यांनी केले. अहवाल वाचन करुन उपस्थितांचे आभार भरत गावीत यांनी मानलेत. पतसंस्तेचे सभासद व कर्मचारी वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.