इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर

0

लंडन : भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीत इंग्लंडचा गोलदाज जेम्स अँडरसनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ओव्हलच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात सोमवारी अँडरसनने २ विकेट घेतले. दुसरी विकेट घेताच अँडरसनने ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये ग्लेन मॅग्राच्या नावावर ५६३ विकेट्स आहेत. तर ३६ वर्षीय जेम्स अँडरसनच्या नावावरही आता ५६३ विकेट्स जमा झाले आहेत. मॅग्राचा सर्वाधिक विकेट्सचा विक्रम मोडून नवा इतिहास रचण्यासाठी अँडरसनला फक्त १ विकेटची आवश्यकता आहे.