बीजिंग । रमजानचा महिना मुसलमानांसाठी पवित्र महिना मानला जातो. जगभरातील मुसलमान हा संपूर्ण महिला श्रद्धापूर्वक उपवास धरतात, मात्र चीनमध्ये असा उपवास धरणार्या मुसलमानांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. 27 मेपासून रमजानचा महिना सुरू झाला असून आतापर्यंत तब्बल 100 मुसलमानांवर ही कारवाई करण्यात आली असून त्यातील काहींना आर्थिक दंड ठोठावण्यात आला असून काहींना थेट सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
सरकारी मुसलमान कर्मचार्यांवर कारवाई
आजवर कारवाई करण्यात आलेल्यांपैकी काही मुसलमान शेतकरी आहेत, तर काही जण सरकारी कर्मचारी आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जे मुसलमान कर्मचारी दुपारचे जेवण टाळतील, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. तर पोलीस, नागरीक सुरक्षा दल हे शेतात घुसून उपवास धरणार्या मुसलमानांना जबरदस्तीने जेवण आणि पाणी पाजत आहेत. अशा प्रकारे सरकारी मुसलमान कर्मचार्यांसह सामान्य मुसलमानांनाही रोजा चा उपवास धरण्यास चीन सरकारकडून प्रतिबंध करण्यात येत आहे.
मुसलमानबहुल ठिकाणीही कारवाई
चीनमधील शिनजियांग हे ठिकाण मुसलमानबहुल आहे. या ठिकाणी रजमानच्या महिनाभरात हॉटेल आणि खान्या-पिण्याची दुकाने बंद ठेवली जातात, मात्र त्यावरही सरकारने प्रतिबंध आणला असून अशा प्रकारे हॉटेल बंद ठेवता येणार नाही, असे चीन सरकारने म्हटले आहे. या ठिकाणी 45 टक्के मुसलमानांची लोकसंख्या आहे. येथे मुसलमानांच्या मुलांना धार्मिक शिक्षण देण्यावरही बंदी आणण्यात आली आहे. या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टीनेही जे मुसलमान कार्यकर्ते रोजा धरतील त्यांची हकालपट्टी केली आहे.