…इथे लग्नाच्या नावाखाली चिमुरड्यांची होते आहे विक्री

0

सना । यमनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले गृहयुद्ध संपायच्या जागी दिवसेंदिवस भीषण होते आहे. या नागरी युद्धामध्ये खूप लोक मारली जाते आहेत इतकेच नाही तर जे लोक तिथे जिवंत आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. यमनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तिकडचे नागरिक बेरोजगार झाले आहेत त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.

तिथे लोकांना रोजगाराचं कोणतंही साधन सध्या उपलब्ध नाही आहे. कित्येक कुटुंब उपासमारीचे बळी होत आहेत. युद्धामुळे तेथेली लोकांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या परिस्थितीमुळे यमनमधील लोक त्यांच्या लहान मुलींचे जबरदस्तीने लग्न करून देत आहेत इतकचे नाही तर अगदी चिमुरड्या मुलींचे वयोवृद्ध माणसाशी लग्न लावून दिले जाते आहे. महत्त्वाचे म्हणजे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी लग्नाच्या नावावर लहान मुलींना विकले जाते असल्याची माहिती समोर येते आहे.

यमनमध्ये राहणार्‍या नसरीन यांच्या घरातील ही कहाणी आहे. यमनमध्ये युद्ध सुरू व्हायचा आधी नसरीन आपल्या पती आणि मुलांसह तिथे आनंदात राहत होत्या. नंतर युद्धामुळे नसरीन यांच्या पतीचे काम बंद झाले. त्यांच्याकडे खाण्याची भ्रांत निर्माण झाली होती. या कारणामुळे नसरीन आणि त्यांच्या पतीमध्ये खटके उडायला लागले आणि या भांडणामुळे त्या दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर नसरीनच्या कानावर एक धक्कादायक बातमी आली. नसरीनचा पती 24 लाख रूपये घेऊन त्यांच्या दहा वर्षांच्या मुलीचे 60 वर्ष वयाच्या एका व्यक्तीसोबत लग्न लावून देतो आहे. ही बातमी समजताच नसरीनने एका वकिलाकडे धाव घेतली. पण त्या वकिलाने मदत करायला नकार दिला. मुलगी 2 महिन्याची जरी असेल तरी तिचे वडील तिच्या लग्नाचा निर्णय घेऊ शकतात असे सांगत त्या वकिलाने मदतीसाठी नकार दिला. नसरीनने जीवाचा आटापिटा करून या दलदलीतून आपल्या मुलीला बाहेर काढले आहे. नसरीनची मुलगी या भीषण परिस्थितीतून वाचली पण यमनमध्ये अजूनही अशा अनेक लहान मुली आहेत ज्यांना यमनमधील भीषण परिस्थितीशी झगडावे लागते आहे.

मुलगी दिली आणि झोपडी घेतली
यमनमध्ये सुरू असलेल्या भीषण वास्तवाचा कुणीही अंदाज लावू शकत नाही. तेथील एका कुटुंबातील व्यक्तीला झोपडी खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडत होते, म्हणून त्या व्यक्तीने झोपडी विकणार्‍याला आपली मुलगी दिली आणि झोपडी विकत घेतली. तिथे राहणार्‍या एका व्यक्तीने जास्त पैसे मिळावे यासाठी आपल्या अल्पवयिन मुलीचे दोन वर्षात तीनवेळा लग्न लावून दिले असल्याची माहिती उघड झाली आहे.