इदगाह ट्रस्टच्या निवडणुकीस स्थगिती

0

जळगाव – मुस्लिम कब्रस्थान व इदगाह ट्रस्ट या संस्थेची 2 सप्टेंबर रोजी होणारी निवडणुकीला स्थगिती मिळाली असल्याचे आदेश महाराष्ट्र राज्य बक्फ मंडळातर्फे देण्यात आले असल्याची माहिती तक्रारदार जमिल देशपांडे यांनी दैनिक जनशक्तिशी बोलतांना सांगितले. गेल्या 15 वर्षापासून मुस्लिम कब्रस्थान व इदगाह ट्रस्ट संस्थेच्या मान्यता प्राप्त योजनेनुसार निवडणुक होत नाही, तसेच संबंधित विश्र्वस्ताकडून व्यावस्थापन करण्यात येत नाही, 2 सप्टेंबर रोजी होणारी निवडणूक ही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या निगराणीत घेण्यात यावी अशी तक्रार जमील देशपांडे यांनी दिली होती. त्यानुसार पाडताळणी केली असता त्यात व्यवस्थापकीय विश्र्वस्तांचा कार्यकाळ हा गेल्या 15 वर्षांपासून आहे. व्यावस्थापकीय विश्र्वस्तांची दर पाचवर्षांनी होणे आवश्यक असून ती घेतली नाही. त्यानुसार अर्जदारानी दाखल केलेल्या कलम 70 अन्वये अर्जाच्या निकाल होईपर्यंत 02 सप्टेंबर रोजी होणारी निवडणुकीस स्थगिती देण्‍यात येत असून 27 सप्टेंबर 2018 रोजी सुनावणी होणार असून संबंधितांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.