जळगाव । असोसिएशन ऑफ इनरव्हील क्लबच्या राष्ट्रीय अध्यक्षा पॅट्रीशिया हिंल्टन (डेहराडून) यांचे तीन दिवस जळगाव दौर्यानिमित्त आगमन होत असल्याची माहिती इनरव्हील डिस्ट्रीक्ट 303 च्या चेअरमन संगिता घोडगावकर यांनी दिली.
भुसावळ रोडवरील कमल पॅराडाईज लॉन येथे शुक्रवार 8 रोजी यांच्या उपस्थितीत इनरव्हील डिस्ट्रक्ट 303 ची कार्यकारी मंडळाची बैठक तर शनिवार दि.9 रोजी सायंकाळी 5.30 वाजता हिंल्टन यांच्या हस्ते त्याच ठिकाणी संस्कृती उत्सव सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. रविवार दि.10 रोजी गांधी तिर्थच्या कस्तुरबा हॉलमध्ये होणार्या स्नेहसरिता या 27 व्या डिस्ट्रक्ट कॉन्फरन्सला अध्यक्षा हिंल्टन प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करणार आहे. नाशिक ते नागपूर या कार्यक्षेत्रातील 50 इनरव्हील क्लबच्या शेकडो पदाधिकारी, सदस्यांची या कार्यक्रमांना उपस्थिती राहणार आहे.