इनरव्हील क्लबतर्फे हरितक्रांती सप्ताहास प्रारंभ

0

भुसावळ। शहरात इनरव्हील क्लबतर्फे हरितक्रांती सप्ताहांतर्गत जामनेर रोडवरील भगिरथी शाळा व म्युनिसिपल हायस्कुलमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व समजविण्यात आले. मुलांना रोपे व कुंड्या देण्यात आल्या दर चार महिन्यांनी क्लबच्या अध्यक्षा वंदना चांडक या रोपांची पाहणी करतील.

यांची होती उपस्थिती
पुढील वर्षी ज्यांच्या रोपांची वाढ व्यवस्थित झालेली आहे. त्या मुलांना बक्षीस देण्यात येईल. या उपक्रमात क्लबच्या माजी जिल्हा आयएसओ आरती चौधरी, माजी अध्यक्षा रजनी सावकारे, सुनिता पाचपांडे यांनी सहकार्य केले. यावेळी कमल सचदेव, संगिता चांडक, शशी लाहोटी, नुतन फालक, किरण शुक्ला, वंदिता पारेख, प्राची राणे यांसह मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.