भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण समारंभ मंगळवार, 30 जून रोजी ऑनलाईन झूम मिटींग द्वारे साजरा करण्यात आला .सन 2020-21या वर्षासाठी नूतन अध्यक्षा मोना भंगाळे यांनी मावळत्या अध्यक्षा मृणाल पाटील यांच्याकडून स्वीकारला तर मावळत्या सेक्रेटरी मोना भंगाळे यांच्याकडून नूतन सेक्रेटरी रेवती मांडे यांनी पदभार स्वीकारला. आगामी वर्षात जास्तीत जास्त समाजपयोगी उपक्रम घेण्याचा मनोदय मोना भंगाळे यांनी व्यक्त केला. अन्य कार्यकारीणीत किरण जावळे, पल्लवी वारके, स्मिता चौधरी, सुनीता पाचपांडे, हेमलता सोनार, आदिती भडंग, डॉ. मृणाल पाटील, कविता पाचपांडे यांचा समावेश आहे.