इनरव्हील क्लब खडकीतर्फे इसिए टीमचा सन्मान 

0
स्वयंसेवकांचा केला सन्मान
खडकी : एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनने सुरु केलेला शाडू माती मूर्ती बनविण्याचे मोफत प्रशिक्षण उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी व इसिए स्वयंसेवकांचे कौतुक करण्यासाठी इनरव्हील क्लब खडकीतर्फे इसिए टीमचा सन्मान करण्यात आला. शाडू माती मूर्ती प्रशिक्षणाच्या पहिला टप्प्यात दि. 10 ते 20 जुलै दरम्यान सर्व शाळा मुख्याधापकांची क्षेत्रीय अधिकार्‍यांसोबत एकत्रित बैठक आयोजित करण्यात आल्या. दुसर्‍या टप्प्यात परिसरानुसार शाळा शिक्षकांना शाडू माती गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दि. 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान शहरातील सांगवी मनपा शाळा, भोसरी मनपा शाळा, आकुर्डी मनपा शाळा आणि चिंचवड स्टेशन मनपा शाळा अशा 4 वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आले.
शिक्षकांना दिले सहभाग पत्र
इनरव्हील क्लब खडकीतर्फे इसिए टीमचा सन्मान करताना स्वयंसेवकांना महागड्या भेट वस्तू, शाल व श्रीफळ देवून प्रत्येकाच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सहभागी 1200 शिक्षकांना सहभाग पत्र देण्यात आले. इसिएने या उपक्रमात 75 कार्यशाळांच्या माध्यमातून 454 शाळातील 1200 शिक्षकांनी, 10 हाऊसिंग सोसायटी, 16 महाविद्यालये, 2 सार्वजनिक ठिकाणी असे संपूर्ण शहरभर यशस्वीरित्या कार्यक्रम राबविले. दि. 8 सप्टेंबर 2018 रोजी या उपक्रमचा शेवट शहरातील मनपा व खाजगी शाळेतील तसेच महाविद्यालयीन मुलांनी बनविलेल्या मूर्तींचे प्रदर्शन करून करण्यात आला. या कार्यक्रमास अदिती हर्डीकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर, इसिए अध्यक्ष विकास पाटील, इनरव्हील रोटरी क्लबच्या वंदना जैन, माधुरी गोडबोले, इसिएच्या विश्‍वस्त विनीता दाते, हिरामण भुजबळ, मूर्ती प्रशिक्षक विश्‍वास फडणीस, सोमेश्‍वर त्रिंबके, डॉ.किशोर निकम, डॉ.चंद्रशेखर पवार आदी उपस्थित होते.