इनरव्हील क्लब पिंपरी स्टारच्यावतीने झाली शाळेची निवड

0

खिंवसरा पाटील शिक्षण संकुल झाले आनंदी शाळा
स्वच्छतागृहाचे नुतनीकरण केले

चिंचवड : थेरगाव येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित, खिंवसरा पाटील शिक्षण संकुल शाळेची इनरव्हील क्लब पिंपरी स्टार या क्लबच्यावतीने ‘आनंदी शाळा’ म्हणून नुकतीच निवड झाली. यावेळी शाळेला विज्ञान प्रयोगशाळा साहित्य, टेबल, ग्रंथालयासाठी कपाट व पुस्तके, क्रीडा साहित्य, वॉटर प्युरीफाय मशीन, मुला-मुलींसाठी वॉशबेसिन, स्टूल, खुर्च्या, स्वच्छतागृहाचे नुतनीकरण करण्यात आले. मुलींसाठी सेनेटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन, डीस्पोजल मशिन बसविण्यात आले. कराटे प्रशिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी 20 टी-शर्ट, पाच मुलींना फीसाठी आर्थिक मदत आदी भरीव सुविधा उपलबध करून दिल्या.

यावेळी जिल्हा अध्यक्षा डॉ. सावित्री रघुपती, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा राधिका माकन, माजी अध्यक्षा मंजु शर्मा, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नटराज जगताप, क्लबच्या सचिव प्रिती पाटील, सविता इंगळे, हरदीप कौर, सीमा शर्मा, अनुराधा राव, राखी बोरा, दर्शना ठाकूर, संस्थेचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, व्यवस्थापक सिद्धेशवर इंगळे क्रांतीवीर चापेकर विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुर्यकांत आरेकर, क्रांतीवीर चापेकर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने, देवीकर सर, बाल विभाग प्रमुख सुनंदा दंडवते, संकुलातील तीनही विभागातील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

क्लबतर्फे गरजूंना मदत
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा राधिका माकन म्हणाल्या की, अनेक शाळांमधून या शाळेची निवड करण्यात आली आहे. मुलांना व मुलींना अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुलींना स्वच्छतेचे महत्व कळले पाहिजे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असते. त्यानुसार काही मुलींना फी भरून दिली आहे. या वेळी शाळेतील इ.8 वी,9 वी च्या मुलींनी कराटे प्रात्यक्षिक सादर केले. माध्यमिक विभागातील मुख्याध्यापक शिक्षकांनी गीताद्वारे इनरव्हील क्लबचे कौतुक केले. गीताची रचना आसाराम कसबे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली सुमंत यांनी केले. प्रास्ताविक विजय पारधी यांनी केले. आभार आश्‍विनी बाविस्कर यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन सुनीता घोडे यांनी केले.