BREAKING: इन्कमटॅक्स, जीएसटी रिटर्न भरण्यास ३० जूनची मुदतवाढ ; केंद्रीय अर्थमंत्र्यांची विविध घोषणा

0

नवी दिल्ली: जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा भारतात मोठ्या प्रमणात फैलाव झाला आहे. भारतातील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ५०० च्या वर आकडा पोहोचला आहे. दरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीची त्यांनी घोषणा केली आहे.

कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावर दिलासा देण्यासाठी आज विविध घोषणा केल्या जाणार आहेत. आयकर, जीएसटीबाबत किंवा इतर उद्याग-व्यवसायाबाबतची घोषणा केली जाणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर परतावा (इन्कमटॅक्स रिटर्न) भरण्याची अंतिम मुदत ३० जून २०२० पर्यंत मुदत वाढ देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. २०१८-१९ साठी ही मुदत वाढविण्यात आली आहे. ३१ मार्च इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत होती, ती आता वाढविण्यात आली आहे. इन्कमटॅक्स रिटर्न भरण्यास विलंब झाल्यास १२ टक्के विलंब शुल्क द्यावे लागत होते, त्यात कपात करण्यात आली असून ९ टक्के विलंब शुल्क करण्यात आली आहे. टीडीएसवरील व्याज दर १८ टक्क्यावरून ९ टक्के करण्यात आले आहे.

जीएसटी रिटर्न भरण्यासही मुदत वाढ देण्यात आली आहे. मार्च-एप्रिल-में महिन्यातील जीएसटी रिटर्नला ३० जून मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

आधारकार्ड-पॅनकार्ड लिंकिंगच्या मुदतीत ३० जूनपर्यंत वाढ करण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली.