कॅलिफोर्निया: ‘इन्स्टाग्राम लाइट’ वेब या नवीन आवृत्तीची घोषणा इन्स्टाग्रामच्या संस्थापकांनी केली आहे. हे नवीन व्हर्जन मोबाईल आणि संगणक या दोन्हीवरती नोटिफिकेशनची सुविधा देणार आहे.
भारतात कोट्यवधी लोक स्मार्टफोन वापरातात. मात्र, अजूनही अनेकजण २जी इंटरनेटचा वापर करतात. त्यांच्यासाठी हा अॅप आपल्या मित्रसोबत संर्पक करण्यास उपयोगी ठरणार आहे. ‘इन्स्टाग्राम लाइट’ अॅप लहान असून, त्यामुळे आपल्याला आपल्या फोनवर स्पेस वाचविण्यास मदत होते.