इफकोच्या प्रतिनिधीपदी संजय पवार, जगन्नाथ पाटील यांची बिनविरोध निवड !

0

जळगाव-इंडियन फार्मर फर्टीलायझर को- ऑपरेटीव्ह लिमिटेड नवी दिल्ली अर्थात इफकोच्या रीजनल जनरल बॉडीच्या प्रतिनिधी म्हणून जळगाव जिल्ह्यातून संजय पवार व जगन्नाथ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. इंडियन फार्मर फर्टिलायझर को-ऑपरेटीव्ह लिमिटेड दिल्लीच्या महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या विभागातून रिजनल जनरल बॉडी प्रतिनिधीच्या निवडणुका होत आहेत, या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या टप्प्याचे मतदान होत आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानातून नाशिक येथे निवडणूक प्रक्रिया पार पडली.

जळगाव जिल्ह्यातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संजय मुरलीधर पवार व चोपड्याचे जगन्नाथ पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे, तसेच नाशिक विभागातून साधनाताई जाधव यांची बिनविरोध निवड झालेली आहे. याच मतदारसंघातून अहमदनगर जिल्ह्यातून नवले यांची निवड झालेली आहे. पदसिद्ध संचालक प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक योगेश म्हसे यांची निवड झालेली आहे. तिसऱ्या टप्प्याची निवडणूक जळगाव येथे होणार असून त्यामधून एक प्रतिनिधीची निवड होणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातून १०५ प्रतिनिधी मतदान करणार आहेत. अनेक सहकार क्षेत्राच्या निवडणुकांमध्ये संजय पवार यांची बिनविरोधची परंपरा आजही त्यांनी कायम ठेवली आहे. इंडियन फार्मर फर्टीलायझर ऑपरेटीव्ह लिमिटेड दिल्ली ही संस्था अनेक क्षेत्रांमध्ये काम करते आहे. प्रमुख व्यवसाय या संस्थेचा रासायनिक खतांचा आहे भारतामध्ये को- ऑपरेटीव्ह मध्ये ही संस्था नंबर एक अशी संस्था आहे. निवडणुकीवेळी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बिपिन कोल्हे, सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, रामनाथ पाटील, सुधीर तराळ, अद्वय हिरे उपस्थित होते.