जळगाव: 35 वर्ष नरेंद्र आण्णा यांनी भ्रष्टाचाराविरोधात जो लढा दिला. त्याला खर्या अर्थाने यश आले आहे. नरेंद्र आण्णा यांनी राज्यसरकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्याकडे 25 वर्ष तक्रारी करुन उपयोग झाला नव्हता. मात्र कर्तव्यदक्ष अधिकारी प्रविण गेडाम म्हणून आयुक्त आले. त्यांना सर्व कागदपत्रे दाखविले. गुन्हा दाखल करणारे कर्तव्यदक्ष प्रविण गेडाम, तपास करणारे इमानदार अधिकारी इशु सिंधू, खटल्यात सरकारपक्षातर्फे काम पाहणारे अॅड. निर्मलकुमार सुर्यवंशी, व अॅड. प्रविण चव्हाण, त्याकाळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, नरेंद्र अण्णा पाटील, अशा सर्व इमानदारांची एक एक कडी जुळल्याने या इमानदारांची तयार झाली व आज सर्व कारागृहात आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसेंचेही यात योगदान आहे. निकालाबाबत समाधानी आहे. सुरेश जैन, मेजर नाना वाणी, प्रदिप रायसोनी व राजा मजुर यांना आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे होती. 100 कोटी जो दंड केला तो योग्य केला. अॅड. विजय पाटील, तक्रारदार स्व.नरेंद्र आण्णा पाटील यांचे बंधू