इमारतींचा ‘पुनर्विकास’ वर शनिवारी चिंचवडमध्ये कार्यशाळा

0

पिंपरी-चिंचवड : परिसरातील इमारती आणि सोसायट्या यांचा विकास होऊन आता 30 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे या परिसराचा पुनर्विकास होणे हा महत्त्वाचा विषय आहे. हे होत असताना या विषयावर नागरिकांच्या मनात अनेक शंका आहेत. या शंकांचे निरसन करण्याच्या उद्देशाने येत्या शनिवारी (दि.16) ‘पुनर्विकास’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. चिंचवड, चाफेकर चौकातील गंधर्व सभागृहात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही कार्यशाळा होणार आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कार्यशाळेत वास्तुविशारद मनोज तातुस्कर, सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ संजय सूर्यवंशी, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. मृदुला चितळे आणि भारतातील अफोर्डेबल हाऊसिंग क्षेत्रातील तज्ज्ञ व ‘वास्तुशोध प्रोजेक्ट’चे व्यवस्थापकीय संचालक सचिन कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थितांच्या प्रश्‍नांना उत्तरे देणार आहेत. ही कार्यशाळा विनामूल्य आणि सर्वांसाठी खुली आहे. प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाणार आहे.