जळगाव । शहरातील सिंधी कॉलनीत असलेल्या सिंधी समाज सेवा मंडळाच्या इमारतीचे दुरूस्तीचे काम सुरू असतांना अचानक स्लॅब कोसळल्याने दोन जणा जखमी झाले असून दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनीतील सिंधी समाज सेवा मंडळाच्या इमारतीचे दुरूस्तीचे काम सुरू आहे. यावेळी जुन्या इमारत पाडून त्याच ठिकाणी नविन इमारतीचे काम सुरू आहे. आज जेसीबीच्या सहाय्याने स्लॅब पाडण्याचे काम सुरू होते. जेसीबीने स्लॅब पाडतांना अचानक इमरतीचा दुसरा भाग इलेक्ट्रिकच्या लोखंडी खंब्यावर पडला. याच वेळी रिक्षा चालक प्रकाश शालिग्राम वंजारी (वय-40 रा. रामेश्वर कॉलनी) हे टॉवर चौकातून प्रवाशी नसातांना खाली रिक्षा क्रमांक (एमएच 19 व्ही 5830)ने रामेश्वर कॉलनीत घराकडे जात असतांना लोखंडी खंबा रिक्षावर पडला. या रिक्षाचालक प्रकाश वंजारी यांच्या डोक्याला जबर मार बसला तर त्याचवेळी थोड्या अंतरावर सुशिलाबाई तुलसीदास मोतीरामाणी (वय-48) रा. सिंधी कॉलनी ह्या त्याच रोडने घराकडे पायी जात होेते. त्यांना देखील हाताचा मोठी दुखापत झाली. दोघांना उपस्थित नागरीकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.