नवी मुंबई । मनपा परिसरातील गाव, गावठाण व झोपडपट्टी परिसरात सध्या जोमाने अनधिकृत इमारती वाढत आहेत. त्याच रोबर अधिकृत इमारतीचेही काम जोरात चालू आहे. परंतु, या इमारती बांधत आसताना कोणतेही साहित्य खाली पडून नागरिकांना इजा पोहोचू नये म्हणून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने एखाद्या नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो म्हणून संबंधित विकासकांनी किमान इमारतीला चारही बाजूला संरक्षक जाळी बसवावी, अशी मागणी एफ प्रभाग समिती सदस्य प्रमोद कदम यांनी केली आहे. गाव गावठाण व झोपडपट्टीमध्ये रोड, रस्ता व अंतर्गत रस्त्या लगत अनधिकृत इमारतीचे बांधकाम चालू आहे. परंतु, काम चालू असताना रस्त्यावरून येणार्या व जाणार्या नागरिक महिला, वृद्ध व लहान मुलांना इमारतीचे काम चालू असताना वीट, वाळूतील खडे तसेच स्लॅबचे तुकडे पडून कोणतीही इजा होऊ नये म्हणून संरक्षक जाळी तात्पुरती बसवणे गरजेचे आहे. परंतु, संबंधित विकासकानी न बसवल्याने आजपर्यंत अनेक नागरिकांना इमारतीचे काम चालू असताना जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
जाळी बसवणे काळाची गरज
त्यामुळें संरक्षक जाळी बसवणे काळाची गरज असल्याचे फ प्रभाग समिती सदस्य कदम यांचे म्हणणे आहे. हाच प्रकार नवी मुंबईत अधिकृत बांधकाम विकासाबाबतीतही घडत आहे. काही विकासक याची गंभीरता घेत घेत नसल्याने एखादा वाईट प्रसंगसुद्धा घडू शकतो. मागील वर्षी घणसोलीतील एका नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या चौथ्या माल्या वरून एक लाकडी वासा थेट खाली पडला होता.त्यावेळी एक युवक बलाबल वाचला होता. त्यामुळें नव्याने बांधण्यात येणार्या इमारती साठी सरंक्षक जाळी तात्पुरती लावणे गरजेचे असल्याचे प्रमोद कदम यांनी सांगितले. याबाबत अतिक्रमण उपायुक्त अमरीश पटनिगरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.