इम्रानखानने ‘नको ते’ मेसेजेस पाठवले…

0

इस्लामाबाद | पाकिस्तान ताहरीक ए इन्साफ पार्टीच्या (पीटीएई) संसद सदस्या आयेशा गुलाली यांनी इम्रान खानने त्यांना अयोग्य मेसेज पाठवल्याचा आरोप केला आहे. याबाबत खुलासेवार न सांगणेच त्यांनी पसंत केले आहे.

गुलाली म्हणाल्या, की ‘पीटीएई’ने पत्रकार परिषदेत माझ्याबद्दल भाष्य केल्याने मला उत्तर द्यावे लागत आहे. पार्टीचे अध्यक्ष इम्रान खान यांना ब्लॅकबेरीवर मेसेज पाठवणे आवडते. बायकांना ते ब्लॅकबेरीच वापरायला सांगतात, कारण त्या मोबाईलवर मेसेज ट्रेस होत नाही. अनेक बायका मेसेजिंगला बळी पडल्या, असे आयेशा गुलालींचे म्हणणे आहे.

बेन्झीर भुत्तोंबद्दल इम्रान यांनी अत्यंत घाणेरडे वक्तव्य केले होते. त्याचा उल्लेखही आयेशांनी आता केला आहे. पार्टीत तिकिट मिळविण्याच्या पद्धती घाणेरड्या असल्याचे सांगत मला आता तिकिट नाही मिळाले तरी चालेल असा त्रागाही त्यांनी व्यक्त केला. आयेशा यांना निवडणुकीचे तिकीट दिले नाही यामुळेच त्यांनी हा बिनबुडाचा आरोप केल्याचा दावा ‘पीटीएई’ने केला आहे. ‘पीएमएलएन’मध्ये जायचे आहे, असेही ‘पीटीएई’च्या नेत्या शिरिन मजारी यांनी म्हटले आहे.

इम्रान यांच्यासोबत काम करू शकत नाही. सन्मान व अब्रूशी मी तडजोड करु शकत नसल्याने राजीनामा देत आहे. इम्रान खान यांचे मानसिक आरोग्य ठीक नाही. खैबर पख्तूनख्वातील तहरीक-ए- इन्साफ पक्षाचे सरकार आणि मुख्यमंत्रीही भ्रष्ट आहेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे भ्रष्टाचारी असले तरी ते महिलांचा सन्मान करतात.
आयेशा गुलाली