इम्रान ताहीरच्या गोलंदाजीसमोर कोलकाता संघ ‘ढेर’; १६१ धावांचे माफक लक्ष !

0

कोलकाता : ख्रिस लीनच्या ८२ धावांच्या खेळीनंतरही कोलकाताला निर्धारित २० षटकात १६१ धावा करता आल्या. ख्रिस लीनची खेळी पाहता कोलकाता मोठी धावसंख्या उभारेल अशी परीस्थित असतांना चेन्नई सुपर किंग्सच्या इम्रान ताहीरने चार प्रमुख खेळाडूंना बाद करत सामन्याचे चित्रच पालटले. त्यामुळे कोलकाताला २० षटकांत ८ बाद १६१ धावा करता आल्या. ताहीरने ४ षटकांत २७ धावा देत ४ विकेट घेतल्या. शार्दूर ठाकूरने दोन विकेट घेतल्या.

ख्रिस लीनने कोलकाता नाइट रायडर्सकडून १००० धावा करण्याचा विक्रम केला. त्याने पहिली धाव घेताच हा पल्ला पार केला. लीनने चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरच्या दोन षटकांत २२ धावा चोपल्या. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मिचेल सँटनरला गोलंदाजीला आणले. आयपीएलच्या या सत्रात प्रथमच चहरला सलग तीन षटके टाकता आली नाही.

सँटनरने कोलकाताच्या सुनील नरीनला बाद करून चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. नरीन २ धावांवर माघारी परतला. कोलकाताला पॉवर प्लेमध्ये १ बाद ४९ धावा करता आल्या. त्यात लीनच्या ३८ धावा होत्या. लीनने फटकेबाजी करताना ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कोलकाताने १० षटकांत १ बाद ७७ धावा केल्या. नितीश राणा ११ व्या षटकात तंबूत परतला, त्याला इम्रान ताहीरने बाद केले. राणाने १८ चेंडूंत तीन चौकारांसह २१ धावा केल्या. त्यानंतर आलेला रॉबीन उथप्पाही पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यावेळेही फॅफ ड्यू प्लेसिसने उथप्पाचा झेल टिपला.