इयत्ता दहावीच्या परिक्षेत दर्शन कुवर नवापूर केंद्रात प्रथम

0

नवापूर। राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परिक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून यात नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी दर्शन हेमंत कुवर 98.40 टक्के गुण मिळवून नवापूर केद्रात प्रथम आला आहे. याबद्दल नवापूर तालुका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा प्रमिलाबाई पाटील यांनी दर्शन कुवर याचे हार्दिक अभिनंदन केले. यावेळी दर्शन चे वडील हेमंत कुवर, आई जयश्री कुवर, हरीश पाटील उपस्थित होते. दर्शन कुवर हा सावरट ता नवापूर येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक हेमंत कुवर यांच्या मुलगा आहे. शाळेचा निकाल 91.60 टक्के लागला आहे.

शहादा तालुक्याचा 86.12 टक्के निकाल
शहादा । एस. ए. मिशन ची विध्यार्थीनी कु. इशा मनोहर पटेल ही 95.20 टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. या शाळेचा निकाल 100टक्के लागला असुन शाळेत द्वितीय हर्षदा सुरेन पाटील 91.20टक्के तर तृतीय मानसी रतिलाल पाटील 90.80 टक्के तर शेठ. व्ही. के. शहा विद्यालयाच्या निकाल 95.25 टक्के लागला असुन प्रथम सुदर्शन जयप्रकाश चौधरी 95टक्के व द्वितीय एश्वर्या योगेश पाटील 94.60टक्के तृतीय विशाखा ललीत अग्रवाल 94.40 टक्के वसंतराव माध्यमीक विद्यालयाचा निकाल 83.33 टक्के लागला असुन अंकित भरतसिंग गिरासे 93.80 टक्केवैभव रमेश पटेल 90 टक्के, यश संजय पवार 89.80टक्के व शारदा कन्या विद्यालयाचा निकाल 82.53टक्के लागला असुन जयश्री योगेश चौधरी 86.20टक्के सिपा रफीक खिमाणी 85.20टक्के ,चेतना दिपक भावसार 83 टक्के. चावरा स्कुल चा 100 टक्के निकाल,तेजल यतेंद्र पाटील 95 टक्के ,यश दिलीप जैन 92.80टक्के जयेश दिपक पाटील 92.60टक्के

जिल्ह्याचा निकाल 86.38 टक्के
नंदुरबार । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत नंदुरबार जिल्ह्यातुन एकलव्य विद्यालयाचा विद्यार्थी जयदीप सुहास नटावदकर हा प्रथम आला आहे, त्याला 98.80 टक्के इतके गुण मिळाले आहेत,या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल 86.38 टक्के लागला आहे.या वर्षी देखील विद्यार्थीनिनीच बाजी मारली आहे .जिल्ह्यातून 20,742 विद्यार्थी परीक्षेत बसले होते ,त्यातून 17917 विद्यार्थी पास झाले आहेत.एकलव्य विद्यालयातील जयदीप नटवदकर याने 98.80 टक्के गुण मिळवीत जिल्यात पहिला येण्याचा मान मिळविला आहे