भुसावळ : गेल्या फेब्रुवारी/ मार्च 2020 मध्ये संपूर्ण राज्यात विविध एचएससी बोर्डाच्या परीक्षा वेळेवर पार पडल्या. त्यानंतर उत्तर पत्रिका कनिष्ठ महाविद्यालयाच्या कस्टडी मधून परीक्षक व नियमकांनी उत्तरपत्रिका तपासल्यानंतर सदरहू उत्तर पत्रिका नियमकांनी बोर्डात मुख्य नियमाकांकडे उत्तर पत्रिका पोहोचवल्या परंतु काही विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले असून ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या कस्टडीमध्ये जमा आहेत. कोरोनामुळे 22 मार्च पासून लॉकडाऊन झाल्यामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्यात त्यामुळे काही नियामक बोर्डाच्या मुख्य नियमाकांकडे उत्तरपत्रिका जमा करू शकले नाहीत अशा उर्वरीत विषयाच्या उत्तरपत्रिका नाशिक विभागीय बोर्डाने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन अधिकृत संकलन केंद्रावरून संकलित कराव्यात त्याचबरोबर परीक्षा केंद्राचे खर्चाचे हिशोब व आउट ऑफ टर्न साहित्य सुद्धा सोबतच जिल्हास्तरीय संकलित केंद्रावर जमा करावे. असे झाल्यास इयत्ता 12 वीचा निकाल वेळेवर लागणार आहे व निकाल बनविण्याची प्रक्रिया सुलभरीत्या राबविता येईल, अशी मागणी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टोचे) अध्यक्ष प्र.शैलेश राणे, सचिव प्रा.नंदन वळींकार, कार्याध्यक्ष प्रा.सुनील सोनार, प्रा.सुनील पाटील, जेष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड, प्रा.अतुल इंगळे, महिला प्रतिनिधी प्रा.स्मिता जयकर, प्रा.मनीषा देशमुख यांनी विशेष पत्राद्वारे केली आहे.