मुंबई: इरफान खान सध्या लंडन येथे कॅन्सरवर उपचार घेत आहे. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या इरफानने एक मोठा निर्णय घेतला आहे. जो त्याने एका पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केला आहे.
इरफानने एका पोस्टद्वारे सांगितले आहे की, तो अमॅझॉन प्राईम व्हिडिओ करता एका वेब सिरीजसाठी चित्रीकरण करत होता, मात्र त्याच्या आजारपणामुळे तो हे चित्रीकरण पूर्ण करू शकत नाही. त्याने या वेबसिरीझचे बरेच चित्रीकरण पूर्ण केले होते, मात्र अचानक त्याच्या आजाराबद्दल कळल्यामुळे त्याने पुढील चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.नुकतीच एक मुलाखत घेण्यात आली होती. यात त्याने सांगितले होते की, सर्व केमोथेरपीचे चक्र संपल्यावरच तब्ब्येतीबाबत काय ते कळेल. आयुष्याची शेवटची घटका कोणती असेल काही सांगता येत नाही, असेही तो म्हणाला होता.
इरफान या आजारातून लवकरात लवकर बरा व्हावा याकरता बॉलिवूड कलाकारांसह त्याचे चाहतेही प्रार्थना करत आहे.