‘इरफान सय्यद हे कामगारांचे नेता नव्हे मित्र’

0

शिवसेना सचिव विनायक राऊत यांचे गौरवोद्गार

पिंपरी : कामगार नेता होणे सोपे आहे, परंतु कामगार मित्र होणे अवघड आहे. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद हे कामगारांवार मित्राप्रमाणे प्रेम करतात. त्यांच्या अडी-अडचणीला धावून जातात. त्यांच्या समस्या सोडवितात. त्यामुळे सय्यद हे कामगार नेते नव्हे तर कामगारांचे मित्र आहेत, असे गौरवोद्गार शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी सय्यद यांच्याबद्दल काढले. तसेच सय्यद हे शिवसेनेला लाभलेले हिरा असून भविष्यात त्यांच्यावर शिवसेनेत मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचेही, त्यांनी सांगितले. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. साद सोशल फाऊंडेशन व इरफान सय्यद मित्र परिवारातर्फे रविवारी संभाजीनगर येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राऊत बोलत होते. वाढदिवसानिमित्त सय्यद यांनी तब्बल सात दिवस त्यांनी विविध सामाजिक उपक्रम घेतले.

पाहुण्यांनी दिल्या शुभेच्छा
राज्याचे गृह व अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर, पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, खेडचे आमदार सुरेश गोरे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका सुलभा उबाळे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, खेड पंचायत समितीच्या सभापती ज्योती आरगडे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश कवडे, कर्जतचे नगराध्यक्ष उमेश गायकवाड, रोहाचे महेश कोल्हाटकर, माथेरानचे चौधरी, आदी यावेळी उपस्थित होते. लेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, विरोधीपक्ष नेते दत्ता साने, नवनाथ जगताप, समीर मासुळकर, साधना मळेकर, अमित गोरखे, राहुल कलाटे, राजू मिसाळ, विशाल यादव, महापौर, खासदार, आमदार, आजी-माजी नगरेसवक यांच्यासह सामाजिक, कामगार अशा विविध क्षेत्रातील पाहुण्यांनी सय्यद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

असंघटीत लोकांना मिळाला नेता
राऊत पुढे म्हणाले की, इरफान सय्यद हे रात्र-दिवस कामगारांसाठी कार्य करत आहेत. त्यांच्या कामाचा शिवसेनेला हेवा, कौतुक वाटत आहे. सय्यद हे शिवसेनेला लाभलेले हिरा आहेत. आजपर्यंत हा हिरा कुठे लपता होता. याची खंत आहे. सध्या कामगार संज्ञा संपुष्टात येत आहे. कामगार शब्दांला विसर्जित केले जात आहे. स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने गेल्या चार वर्षात कामगार वर्गाला मोठी गळती लागली आहे. असंघटित असलेल्या वर्गाला कामगार नेता मिळत नव्हता. ती उणीव इरफान सय्यद यांनी भरुन काढली आहे. सय्यद यांची शिवसेनेला आवश्यकता आहे. त्याची जाणीव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झाली आहे. भविष्यात सय्यद यांच्यावर शिवसेनेत मोठी जबाबदारी येईल.

कामगारांना हक्क मिळवून दिले
गृह राज्यमंत्री दिपक केसरकर म्हणाले की, भारतीय कामगार सेनेचा जन्म 50 वर्षापुर्वी झाला. शिवसेनेने कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले. एकही व्यावसाय बंद होऊन दिला नाही. प्रत्येक क्षेत्रात शिवसेनेची कामगार सेना कार्यरत आहे. कामगारांचे लढे दडपले जाणार नाहीत. गृहराज्यमंत्री म्हणून ती माझी जबाबदारी आहे. कामगार हा भाऊ आहे. इरफान सय्यद हे कामगारांसाठी मोठे काम करत आहेत. शिवसेनेत त्यांना लवकरच चांगली संधी मिळेल.

कामगारांना घरे देण्याचा संकल्प
गौतम चाबुकस्वार म्हणाले, इरफान सय्यद यांनी स्वत:च्या जागेत कामगारांना घरे देण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी मंत्रालय स्तरावर मदत केली जाईल. पश्‍चिम महाराष्ट्रात त्यांनी संघटनेचे मोठे जाळे निर्माण केले आहे. दिवसें-दिवस त्यांना कामगारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. शिवसेना मजबूत करण्यासाठी त्यांचा मोठा आधार लाभला. या आधाराला शिवसेनेच्या माध्यमातून ताकद दिली जाईल. भविष्यात शहरात मोठा कामगार मेळावा घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलविण्यात येईल.

राबविले विविध उपक्रम
सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल सात दिवस विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. दहावी उत्तीर्ण झालेली दिव्यांग विद्यार्थीनी सीमा खरात आणि वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सुचित्रा बेडखरे यांच्या भविष्यातील शिक्षणाचा खर्च इरफान सय्यद यांनी उचलला आहे. या दोघींच्या शिक्षणाचा संपुर्ण खर्च सय्यद करणार आहेत. तसेच बांधकाम मजुरांच्या मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर यंदापासून गुणवंत कामगारांना ‘भक्ती-शक्ती’ पुरस्काने गौरविण्यास सुरुवात केली आहे. यंदाचा गुणवंत कामगार पुरस्कार भिवाजी वाटेकर, खंडू गवळी, मोहन माने, एकनाथ तुपे आणि मुरलीधर कदम यांना तर सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार दिव्यांगांसाठी कार्य करणारे दिव्यांग सुनील चोरडीया यांना प्रदान करण्यात आला आहे. मोशी, बोर्‍हाडेवाडी येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा 500 जणांनी लाभ घेतला. जिल्ह्यातील 20 जिल्हा परिषद शाळेस प्रिंटर भेट देण्यात आला. तसेच शिंदे शाळेस सिलींग फॅनदेखील भेट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. तसेच गरजूंना चष्मे वाटप करण्यात आले. मोफत छत्री वाटप, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबिर, खाऊ वाटप करण्यात आला आला. तसेच नोंदणी अभियान देखील राबविण्यात आले.