इराकमधील ऑटोमन साम्राज्याचा किल्ला इसिसकडून सोडवला

0

तल अफर : इराकी सुरक्षा दलांनी तल अफर शहरातील इसिसच्या तळांचा विध्वंस केला असून नागरी विभागात असलेल्या इसिसच्या शेवटच्या आश्रयस्थळाचा व बालेकिल्ल्याचा नाश इराकी सैनिकांनी केला आहे. दहशतवादविरोधी दलांनी ऐतिहासिक ऑटोमन बालेकिल्ल्यावर वर्चस्व मिळवले आहे.

जनरल अब्दुलामीर याराल्लाह यांनी ही माहिती प्रसारीत केली आहे. पंतप्रधान हैदर अल आबादी यांनी जुलैमध्ये मोसूल या शहरावर ताबा मिळविल्याच जाहीर केले होते. इसिसने २०१४ मध्ये हे शहर खिलाफतीचे स्थान असल्याचे सांगितले होते.

इराकी सुरक्षा दलांनी इसिसला हुसकावून लावण्यात मोठे यश मिळवले आहे. फ्रान्सच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांनी इराकला पाच कोटी १२ लाख डॉलरची मदत जाहीर केली आहे. इराकची अर्थव्यवस्था तेलाच्या किमतीतील घट आणि इसिससोबतच्या युद्धाच्या खर्चाने कोलमडली आहे. इराकी सैन्याला इसिसविरोधात अमेरिकेनेही सक्रीय मदत केली आहे. इसिसवर पूर्ण विजय दोन सप्टेंबर रोजी ईद अल अधाच्या दिवशी जगजाहीर केला जाईल, असे उच्चपदस्थ अधिकारी सांगत आहेत.