इराणध्ये विमान अपघातात 66 जणांचा मृत्यू

0

विमानात 60 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर

तेहरान : इराणचे प्रवासी विमान कोसळल्याने 66 जणांचा मृत्यू झाला. इराणच्या दक्षिण भागात एटीआर 72 या विमानाचा अपघात झाला. विमान तेहरानहून यासूज येथे निघाले होते. विमानातील 66 जणांचा मृत्यू झाला आहे. तेहरान येथील मेहराबाद इंटरनॅशनल विमानतळावरून विमानाने उड्डाण केले होते, अशी माहिती इराण असेमन एअरलाइन्सने दिली.

इराणमधील अनेक विमाने जुनी
विमानाने उड्डाण केल्यानंतर काहीक्षणातच रडारशी विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर या विमानाचा अपघात झाला. हे विमान सेमीरोमजवळ कोसळले. विमानातील एकही प्रवासी वाचू शकला नाही. विमानात एका लहान मुलासमवेत 60 प्रवासी तर 6 क्रू मेंबर होते. दोन इंजिन असलेले हे विमान कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरले जात होते, अशी माहिती असेमन एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने इराण टीव्हीला दिली. अपघाताचे नेमके कारण काय अद्याप समजू शकलेले नाही. मात्र अपघाताची चौकशी करण्यात येते आहे अशी माहिती, असेमन एअरलाइन्सच्या अधिकार्‍यांनी दिली. इराणमधील अनेक विमाने जुनी झाली असून त्यामुळे विमान अपघातांमध्ये वाढ झाली आहे. इराणने एअरबस आणि बोइंग यांच्यासोबत नवी विमाने घेण्यासाठी करार केले आहेत.