इराणी मोहल्ल्यातून सहा गुन्हेगारांना अटक

0

भुसावळ । शहरात विविध गुन्ह्यातील फरार आरोपी इराणी मोहल्ल्यात असल्याची माहिती मिळाल्यावरुन बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवार 14 रोजी पहाटेच्या सुमारास अचानकपणे धाड टाकून 6 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सादीक अली इबादत अली (वय 30), जावेद उर्फ लंगअली फिरोज अली इराणी (रा. पापानगर, भुसावळ) हे दोघे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी असून काही दिवसांपासून फरार होते. तर अब्बास अली कमरअली जाफरी (वय 25, रा. भिवंडी), हुसेन आयाबी इरानी (वय22, रा. नगर भिवंडी), मिस्कीन जावेद जाफरी (वय 29, पापा नगर, भुसावळ), मोहम्मद अली शौकत अली (वय 42, पापा नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली असून यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.