नवी दिल्ली । ईशान्य भारतातील नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि तेथे तैनात लष्कराला विशेषाधिकार देणारा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी तब्बल सोळा वर्षे संघर्ष करणार्या मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. 16 वर्षे उपोषण करून मणिपूरच्या लोकांसाठी संघर्ष करणार्या इरोम यांनी ब्रिटिश नागरिक डेसमंड कॉटन्हो यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्नासाठी आणखी काळ प्रतीक्षा
बुधवारी ( 12 जुलै ) इरोमनं लग्नासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं कोडाईकनालमधील सब रजिस्ट्रार कार्यालयात जमा केली आहेत. इरोम व डेसमंडला लग्नासाठी आणखी काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण डेसमंड ब्रिटिश वंशाचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सब रजिस्ट्रार राजेश यांनी सांगितले की, इरोम व डेसमंड यांना लगेचच लग्न करण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही. यामागे आंतरजातीय विवाह असल्याचे कारण त्यांनी सांगितले.