पुणे । लायन्स क्लब्ज ऑफ इंटरनॅशनल आयोजित आंतरमहाविद्यालयीन इलिट करंडक 16 ऑगस्ट 2017 रोजी होणार आहे. हिंदी व मराठी सिनेसंगीताची ही स्पर्धा आहे. नवी पेठेतील गांजवे चौकातील पत्रकार भवनातील कमिन्स सभागृहात ही स्पर्धा रंगणार असल्याची माहिती संयोजिका जयश्री पेंडसे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी नागेश चव्हाण, अनुराधा शास्त्री, सुधाकर कुमठेकर आदी उपस्थित होते. प्रथम पारितोषिक फिरता करंडक, 5 हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह, दुसरे पारितोषिक 3 हजार रुपये व स्मृतीचिन्ह, तिसरे पारितोषिक 2 हजार रुपये व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी 4.30 वाजता होणार आहे. लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलचे प्रांतपाल गिरीश मालपाणी आणि सुनिता मालपाणी या स्पर्धेच्या बक्षिस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.