इलेक्ट्रिक शॉक लागून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

0

धुळे- शेतात काम करत असलेल्या 28 वर्षीय तरुण शेतकर्‍यास इलेक्ट्रिक शॉक लागल्याने रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथे घडली. विखरण गावातील शेतकरी भुरेसिंग सत्तरसिंग गिरासे (28) हे गावालगत असलेल्या आपल्या शेतात काम करीत असताना इलेक्ट्रिक वायरला धक्का लागल्याने गिरासे हे शॉक लागून जखमी झाले असता त्याठिकाणी उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ दोंडाईचा येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान उपस्थित डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजले. याबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.