मुक्ताईनगर- तालुक्यातील घोडसगाव शिवारातील उसाच्या शेतात इलेक्ट्रीक तार पडल्याने आग लागून सुमारे साडेसहा लाखांच्या उसासह शेती साहित्याचे नुकसान झाल्याची घटना 27 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी घोडसगाव तलाठ्यांनी धाव घेत पंचनामा केला. घोडसगाव शिवारातील गट क्रमांक 25 मध्ये अजयकुमार मोहनलाल पटेल यांची शेतजमीन असून त्यांची उसाचा पेरा केला आहे. गुरुवारी दुपारी शेतातून गेलेल्या वीज वाहिनीवरील इलेक्ट्रीक तार उसाच्या शेतात पडल्याने शॉर्ट सर्किट होवून आग लागली. पाहता-पाहता दोन हेक्टर 16 आरवरील चार लाख 80 हजारांचा ऊस, 35 हजारांचे पीव्हीसी पाईप व सव्वा लाखांच्या ठिबक नळ्या मिळून साडेसहा लाखांचे नुकसान झाले.