इलेक्ट्रीक मोटारीसह दुचाकी चोरटे जाळ्यात

0

पिंपळगाव हरेश्‍वर पोलिसांची यशस्वी कामगिरी

पिंपळगाव हरेश्‍वर:- आंबेवडगाव येथे घरासमोरील इलेक्ट्रीक मोटारीची चोरी झाल्याची घटना 9 मार्च रोजी घडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. भूरट्या चोरट्यांचा शोध सुरू असताना गोपनीय माहितीवरून पोलिसांनी दोन संशयीताना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली देत चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सोमनाथ सुभाष शेळके (21, आंबेवडगाव, ता.पाचोरा) व दीपक रमेश शिरसाठ (21, वरखेडी, ता.पाचोरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक केशव पातोंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, किशोर राठोड, शिवनारायण देशमुख, प्रल्हाद शिंदे, विनोद पाटील, अरुण राजपूत, धीरज मंडलिक आदींच्या पथकाने केली. दरम्यान, संजय पाटील (आंबेवडगाव) यांच्या घराबाहेरून लांबवलेली तीन एचपीची इलेक्ट्रीक मोटारसह दोन दुचाकी आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या आहेत. तपास नाईक किशोर राठोड करीत आहेत.