जळगाव। इलेक्ट्रीक शॉक लागून कोल्हेनगरातील तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी घडली आहे. दरम्यान, जखमी तरूणाला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ नातेवाईकांनी दाखल केले आहे.
कोल्हे नगरातील रहिवासी दरबार सरिचंद पवार (वय-40) यांना गुरूवारी सकाळी इलेक्ट्रीक शॉक लागला. यात ते जखमी झाल्याने त्यांना लागलीच नातेवाईकांनी उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले. किरकोळ जखमा झाल्या असून त्यांची प्रकृति स्थिर असल्याचे समजते.