इलेक्ट्रीक शॉक लागून आव्हाणे येथील वृध्द महिलेचा मृत्यू

0

जळगाव। कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आलेल्या वृध्द महिलेला विद्यूत खांबाला स्पर्श झाल्याचे विजेचा धक्का लागला. यात त्या वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास आव्हाणे गावात घडली. दरम्यान, वृध्द महिलेस दुपारी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी नातेवाईकांनी व गावकर्‍यांनी रूग्णालयादी गर्दी केली होती.

आव्हाणे गावातील रहिवासी सुमनबाई रमण पाटील (वय-60) ह्या गुरूवारी दुपारी 1 वाजेच्या उखीरड्यावर कचर टाकण्यासाठी घराबाहेर निघाल्या. कचरा टाकल्यानंतर त्यांना बाजूलाच असलेल्या विद्यूत खांब्याचा स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत लागलीच सुमनबाई यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सुमनबाई यांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. यावेळी वृध्द महिलेच्या नातेवाईकांसह गावकर्‍यांनी रूग्णालयात एकच गर्दी केली होती. सुमनबाई यांच्या पश्‍चात पती, दोन मुले असा परिवार आहे.