इलेक्ट्रॉनीक सेन्सर बझरमुळे कार चोरीचा प्रयत्न फासला

0

जामनेर। घरासमोर लावलेली कार चोरट्यांनी कारचा पुढील गेटचा काच फोडून सेंटर लॉक उघडून कार चोरून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न कारला असलेल्या सेन्सर बझर मुळे पुरता फसला. औरंगाबाद येथे शाळेत शिक्षक असलेले. संतोष मुरलीधर जैन हे शहरातील शिव कॉलनी येथे मोठ्या भावाकडे काल 6 मुक्कामाला थांबले होते. अचानक त्यांना मध्यरात्रीनंतर साडेतीन वाजे दरम्यान आपली कार (एम.एच.20 डि.व्हि.0986) कारचा बझर वाजत असल्याचा आवाज ऐकू आला. मात्र सुरूवातीला त्यांनी कानाडोळा केला. नंतर लक्ष देवून ऐकल्यावर आपल्याच कारचा आवाज येत असल्याचे त्यांना समजले.

बझरचा आवाज ऐकून चोरटे झाले पसार
बझर वाजत असल्याचा आवाज ऐकू आल्यावर चोरटे आवाजामुळे पसार झाले होते. मागील दोनच महीना भरापुर्वी तालूक्यासह परिसरातील जेसीबी, ट्र्ँक्टर, मोटर सायकल चोरींच्या घटनांमुळे नागरिंकांच्या मनात वाहन चोरट्यांची दहशत पसरली होती. मात्र जामनेर पोलीसांसह नागरिकांच्या समय सुचकतेने या वाहन चोरट्यांच्या रँकेटच्या मुसक्या आवळण्यास पोलीस प्रशासनाला यश आले होते. परंतु आता वाहन चोरट्यांचे अजून काही नवीन रँकेट सक्रीय झाले असू शकते. हे कालच्या कार चोरीच्या झालेल्या प्रयत्नातून उघड होत आहे.