आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी केले परिपत्रक
पिंपरी चिंचवड: लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त्या झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचार्यांना थंब इम्प्रेशनमधून सवलत देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या कामासाठी महापालिका कर्मचार्यांना पाठविणे बंधनकारक आहे. लोसकभा निवडणुकीच्या कामकाजाकरिता पालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचार्यांच्या नियुक्त्या लोकसभा मतदार संघाअंतर्गत केल्या जातात. नियुक्तीचे आदेश महापालिकेकडे पाठविले जातात.
दैनंदिन स्वाक्षरी करणे बंधनकारक
संबंधित विभागामार्फतच निवडणूक कामकाजाकरिता अधिकारी, कर्मचार्यांना कार्यमुक्त करण्यात येते. महापालिका अधिकारी, कर्मचार्यांची सेवा लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मधील कलम 29 या अधिनियमानुसार निवडणूक कामकाजाकामी अधिग्रहित करण्यात येते. निवडणुकीचे कामकाज हे राष्ट्रीय कामकाज असल्याने अधिकारी, कर्मचारी यांना महापालिकेच्या बायोमेट्रीक थम्ब उपस्थिती प्रणातीलून सवलत देण्यात आली आहे. निवडणूक कार्यालयाकडे रुजू झालेल्या दिनांकापासून ही सवलत देण्यात येत आहे. निवडणूक कामकाजातून कार्यमुक्त केल्यानंतर अधिकारी, कर्मचार्यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशनद्वारे उपस्थिती नोंदवणी आणि हजेरी पत्रकावर दैंनदिन स्वाक्षरी करणे बंधनकारक राहील, असे परिपत्रकात म्हटले आहे.