इवलेसे रोप लावियले दारी…, तयाचा वेलू गेला गगनावरी!

0

जळगाव। दैनिक ‘जनशक्ति’ वृत्तपत्र समुहाच्या 63व्या वर्षपुर्तीनिमित्त जळगाव कार्यालयात शहराचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्य संपादक कुंदन ढाके, संपादक शेखर पाटील यांची भेट घेवून रोपटे देवून पर्यावरणाचा समतोल साधला, संपादक शेखर पाटील यांनी 63 वर्षाच्या वाटचालीचा आढावा दिला.

आमदार सुरेश भोळे यांनी ‘सिध्दीविनायक ग्रुप‘ ने प्रसार माध्यम क्षेत्रात सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी जनशक्तिच्या माध्यमातून सुरु केलेल्या व्रतस्थ पत्रकारितेचा गौरव केला.