मुंबई :बॉलीवूडची बाप लेकीची जोडी अनिल कपूर आणि सोनम कपूर यांचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट लवकरच रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटातील ‘इश्क मिठा’ हे नवीन गाणं प्रदर्शित झाले आहे.
‘इश्क मिठा’ गाण्यात अनिल कपूर आणि सोनम कपूर यांचा पंजाबी डान्स पाहायला मिळणार आहे. ‘गुड नाल इश्क मिठा’ या गाण्याचे हे गाणं रिमेक आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.