शहादा । येथील पंचायत समितीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात इष्टा शिक्षक संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादाभाई पिंपले होते. प्राथमिक शिक्षकांचा होवू घातलेल्या बदल्या, ग्रामीण व अतिदुर्गम भागातील शिक्षकांवर होत असलेले अन्याय याविषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात बदली धोरणाला विरोध असतांना नंदुरबार जिल्ह्यासारख्या भौगोलिक दृष्ट्या 65 % अतिदुर्गम असलेल्या तालुक्यांना हा शासन निर्णय अतिशय चांगला आहे. नवीन धडगाव तालुक्यात नौकरीस असलेल्या शिक्षकाला पुन्हा धडगाव येथे नोकरीस जावे लागत असल्याची परिस्थिती असल्याचे दादाभाईंनी सांगितली.
मोर्चा काढण्याचे आवाहन
बदल्या झाल्या पाहिजेत यासाठी मोर्चा काढण्यात यावा असे यावेळी सांगण्यात आले. प्रास्ताविक रघुनाथ बळसाणे यांनी तर सूत्रसंचालन लक्ष्मण कोळी यानी केले बैठकीस धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.