मळवली । मळवली येथे भाड्याने राहणार्या एका इसमाने हाताची नस कापून गळफास घेतल्याची घटना 28 फेब्रुवारीला मध्यरात्री घडली. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नेताजी पांडुरंग कांबळे (वय 34) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
नेताजी याचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर सहा महिन्यांनी त्याची बायको माहेरी निघून गेली. त्यातून आलेल्या नैराश्याने त्याला दारूचे व्यसन लागले. तो मळवली येथे भाड्याने एकटाच राहत होता. बुधवारी रात्री तो घरात होता. गुरुवारी रात्रीपर्यंत त्याच्या घराचा दरवाजा बंद दिसला. त्यामुळे शेजार्यांना संशय आला. शेजार्यांनी कामशेत पोलिसांना कळविले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी नेताजीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. तसेच त्याने हाताची नस कापलेली आढळली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.