मोशी परिसरात राबविला उपक्रम
पिंपरी : एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनतर्फे पिंपरी-चिंचवड शहरात ई कचरा संकलन उपक्रम सुरू आहे. प्रत्येक रविवारी नागरिकांच्या सहमतीने त्यांच्या परिसरात इ कचरा संकलन केले जात आहे. नुकताच असा प्रयत्न मोशी, वाकड आणि पिंपळे सौदागर परिसरात यशस्वीपणे पार पडला. नागरिकांनी आपल्या घरातील अथवा कार्यालयातील ई कचरा इसिएच्या स्वाधीन केला, असे इसिएचे संचालक विकास पाटील यांनी सांगितले.
नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
विकास पाटील पुढे म्हणाले की, आता नागरिकांमध्ये जागृती होताना दिसत आहे. प्लास्टिक वापर टाळावा, कापडी पिशव्या वापराव्यात यासाठी नागरिक जागरूक झाले आहेत. ई-कचरा संकलनामध्ये नागरिक स्वतःहून नागरिकांनी दिलेल्या वस्तू एकत्रित पणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या अधिकृत रिसायकलरकडे सुपूर्द करतो. त्यानंतर त्याचे शास्त्रीय पद्धतीने विघटन करतो. जेणे करून आपल्या पर्यावरणाचे कोठेही प्रदूषण होत नाही. मोशीमधील जल वायू विहार सोसायटी, पिंपळे सौदागर मधील द्वारकाधीश रेसिडेन्सी, द्वारका फ्लोरा सोसायटी आदी ठिकाणांवरून प्रतिसाद मिळत आहे. लवकरच इतर सोसायट्यांमधूनही असाच प्रतिसाद मिळणार अशी अपेक्षा आहे.
पालिकेचे संकलन केंद्र लवकरच
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका लवकरच स्वतःचे मध्यवर्ती ई संकलन केंद्र तयार करीत आहे. त्या उपक्रमात इसिए महापालिकेला मदत करणार आहे. ऑगस्ट 2018 पर्यंत हे केंद्र प्राथमिक अवस्थेत नावारुपाला येवू शकेल. यावेळी विश्वास जपे, पुरषोत्तम पिंपळे तसेच स्वयंसेवक प्रभाकर मेरुकर, दत्तात्रेय कुमठेकर, शिकंदर घोडके, गोविन चितोडकर, सुभाष चव्हाण, अनिल दिवाकर, गोरक्षनाथ सानप, अरुण पाटोळे, संदीप कुटे, सोनाली चीद्वार, सुषमा पाटील, अनघा दिवाकर, मीनाक्षी मेरुकर आदी मंडळी ह्या उपक्रमात सहभागी आहेत.