इसिऐने केले स्वच्छता फेरी, निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन

0
स्वच्छ भारत जनजागरण उपक्रमात 2800 विद्यार्थांचा सहभाग 
शहरातील गल्ली बोळात जाऊन विद्यार्थ्यांनी केली जनजागृती
पिंपरी : एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनच्यावतीने पिंपरी-चिंचवड मनपा शाळांच्यासोबत स्वच्छ भारत जनजागरण फेरी, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यानुसार शहरातील 635 शाळांमधून विविध उपक्रम सुरु झाले आहेत. शहरात स्वच्छ भारत जनजागरण करण्याबाबत लाखो विद्यार्थी शिस्तबद्ध उपक्रम राबवीत आहेत. त्याचे संपूर्ण नियोजन पिंपरी-चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 2800 विद्यार्थी स्वच्छ भारत जनजागरण फेरीमध्ये सहभागी होणार आहेत.
विद्यार्थ्यांनी केले जनजागरण
शनिवारी थेरगाव व काळेवाडी परिसरातील नजदीकच्या सर्व शाळांमधील 4 थी इयत्ता वरील सर्व विद्यार्थी, शाळा शिक्षक सकाळी 8.00  वाजता थेरगाव शाळेच्या पटांगणावर एकत्र जमा झाले. यावेळी महापौर राहुल जाधव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, विद्यमान नगरसेविका अर्चना बारणे, सहा. आरोग्य अधिकारी एस.एस.कुलकर्णी, आर.एम.बेद, एस.जी.इनामदार, एस.डी.निंबाळकर, सहा.प्रशासन अधिकारी पराग मुंडे, इसिए चेअरमन विकास पाटील, अनघा दिवाकर, प्रभाकर मेरुकर, सुभाष चव्हाण, शिकंदर घोडके, इंद्रजीत चव्हाण व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. 2800हून जास्त विद्यार्थी यामध्ये सहभाग नोंदवून शहरातील रस्तो रस्ते व गल्ली बोळातून फिरून जोरदार व प्रभावीपणे सादरीकरण करून नागरिकांना स्वच्छ भारत ही सेवा ह्या आशयाचे जनजागरण केले.
105 शाळांमधून उपक्रम
प्रत्येक शाळेने ढोल, ताशा, लेझीम या प्रकारांचा वापर करून शहरातील वातावरण स्वच्छ भारत ही सेवा याविषयी फार पूरक बनविण्यात यशस्वी झाले. महापालिकेच्या 105 शाळांमधून हा उपक्रम एकाच वेळी सर्वत्र शहरात राबविला गेला. महापौरांच्या शुभ हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला. शहरातील नागरिकांच्या मनात पर्यावरण संवर्धनाच्या बाबत सकारात्मक मानसिकता निर्माण करण्यासाठी एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) सदैव महापालिका धोरणांना पाठींबा दर्शवित आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सवानंतर आता लाखो विद्यार्थी (3 लाख अंदाजे ) यामध्ये सामाविष्ट होत आहेत.