पिंपरी: इसीएच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरात गेली 3 वर्षे पर्यावरण पूरक गणेशोत्सव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना शाडुमातीच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. महानगरपालिकेच्या शाळेत व हौसिंग सोसायट्यांमध्ये उपक्रम राबवला. त्यासाठी लागनारी शाडुमाती व प्रशिक्षक इसीएने पुरवले. गणेश विसर्जनाच्या वेळी मूर्तीदान व निर्माल्य दान करणाऱ्या गणेशभक्तांना मोफत कंम्पोस्ट खत वाटप केले जाते. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. इसीएचे दिवंगत अध्यक्ष विकास पाटील यांचा या उपक्रमात महत्वाचा वाटा होता. कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा २० जुलैला मृत्यू झाला. परंतु पंरपरा खडीत न करता हा उपक्रम चालुच ठेवला आहे. कम्पोस्ट खत वाटतांना नगरसेवक सचीन चिखले ह्यांची साथ लाभली. पर्यावरण टिम राहुल श्रीवास्तव, सिकंदर घोडके, आनंद गुप्ता, नितीन मोरे, मुकेश सिंग ह्यांनी मदत केली. कंम्पोस्ट खत वाटप सुरूच राहील अशे ईसीएच्या ट्रस्टी विनीता दाते यांनी सांगितले.