इस्कॉनतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त महामहोत्सवाचे आयोजन

0

भुसावळ । श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रासयात्रा दास यांनी दिली. येथील एलआयसी बिल्डींग समोरील श्री श्री राधा मुरलीधर मंदिरात पत्रकार परिषदेत दास यांनी कार्यक्रमासंदर्भात माहिती देताना सांगितले की, इस्कॉनतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त 16 ऑगस्ट रोजी शांती नगरातील कमळ गणपती सभागृहात सायंकाळी 6 वाजेपासून किर्तन, महाअभिषेक, प्रवचन, नाटीका, श्रृंगार दर्शन, आरती तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

इस्कॉनला 50 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त यंदा कृष्ण जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भगवान श्री कृष्णांना दुध, दही, शुध्द तुप, सहद अश विविध 25 प्रकारच्या व्यंजनांनी अभिषेक घालण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रवचनासाठी मुंबईहून आयआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतलेले तसेच इस्कॉनचे पुर्णवेळ प्रचारक सुदामा प्रभू येणार आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. यानिमित्त तयारीला वेग आला असून नगरसंकिर्तनाद्वारे नागरिकांना माहिती देत असल्याचेही दास यांनी सांगितले.